Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर याचे शुभहस्ते होणार कार्यशाळेचे उदघाटन!

विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात नगदी पिक म्हणनू नावाजलेले कापसाचे पिक आता विविध कारणांनी चर्चेत आहे यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणत उद्रेक झालेल्या गुलाबी किंवा शेंदरी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विदर्भातील तसेच मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील बीटी कपाशीचे पिक या शेंदरी बोंड अळीला बळी पडले व परिणामी कपाशीच्या सरासरी उत्पादकतेत घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. अर्थात, या किडीच्या एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती विषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. व्ही एम भाले यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांनी जाणीव जागृती करून नुकसान कमी होण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले. सोबतच गतवर्षी फवारणी दरम्यान उद्भवलेल्या विषबाधांच्या घटना घडू नये याकरिता सुद्धा विद्यापीठा अंतर्गत कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रांसह कृषी तंत्र विद्यालये, कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहितीसह गावो गावी पाठवनू पिक फवारणी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार केला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेन्द्रजी फडणवीस, यांनी सुद्धा गत हंगामातील नुकसानीची तीव्र दखल घेत केंद्रीय कृषीमंत्री मा.ना. राधामोहन सिंह, केंद्रीय जलसंधारण मंत्री मा. ना. नितिनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री मा. ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे विशेष उपस्थितीत केंद्र तथा राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठांचे कुलगरू तथा शास्त्रज्ञ यांचे उपस्थितीत नागपूर येथे डिसेंबर महिन्यात उच्चस्तरीय बैठक घेतली होती. सदर बैठकीत कृषी विद्यापठे व कृषी विभागा मार्फत बीटी कपाशीवरील शेंदरी बोंड अळी नियंत्रणा संदर्भात येत्या खरीप हंगामापासनू जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्याविषयी सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने रविवार दिनांक ११ मार्च २०१८ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता कृषी महाविद्यालय, अकोलाच्या कमिटी सभागृहात "कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन :: राज्यस्तरीय हंगामपूर्व एकदिवसीय कार्यशाळेचे" आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचे संयुक्त विद्यमाने तथा राज्याच्या कृषी विभागाच्या सहयोगाने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री मा. ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे शुभहस्ते उदघाटीत होणाऱ्या या अतिशय महत्वाकांक्षी कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) मा. श्री. विजयकुमार सिन्हा, आयुक्त कृषी मा. श्री. सचिद्रं प्रताप सिंह आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे कुलगरू डॉ. व्ही एम भाले व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. परभणीचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू प्रास्ताविक करणार असून गुजरात राज्यातील आनंद कृषी विद्यापीठाचे व किटकशास्त्रज्ञ डॉ. पी के बोरड, नवसारी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एच आर देसाई यांचेसह किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे विभाग प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे, किटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. परभणीचे विभाग प्रमुख डॉ. पी आर झंवर तांत्रिक सादरीकरण करणार आहेत.

या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातनू कृषी संचालक, विभागीय कृषी सहसंचालक, व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यशाळेतनू मिळणाऱ्या माहिती व सचूनांचे सूचनांचे आधारे कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तंत्र कृषी विभागाद्वारे गावोगावी राबविण्यात येऊन येणाऱ्या खरीप हंगामांत अधिक उत्पादन होण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एम भाले यांचे मार्गदर्शनात संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे व त्यांचे सर्व सहकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Source: https://www.pdkv.ac.in

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com