Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

नाशिक व वर्धा जिल्ह्यात ऑनलाईन सातबाऱ्याला सुरवात.

आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून शेतकऱयाांना ऑनलाईन सातबारा उतारा देण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने या कामाला गती द्यावी, असे आवाहन मुख्यमांत्री देवेंद् फडणवीस याांनी येथे केले.

नाशिक व वर्धा या दोन जिल्ह्यात डिजीटल सीग्नेचर असलेला सातबारा उतारा देण्याच्या सुविधेचा शुभारांभ मुख्यमांत्री देवेंद् फडणवीस याांच्या हस्ते व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील याांच्या उपस्स्थतीत करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहीती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयक मार गौतम आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्य शासनानेसामानयाांच्या सुविधासाठी डिजीटल व्यासपीठाांचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आता ऑनलाईन डिजीटल सही असलेला सातबारा उतारा देण्याची सुविधा र्निमाण करण्यात आली आहे. पथदर्शी प्रकल्पात नाशिक व वर्धा या दोन जिल्ह्यातत पुर्णपणे ऑनलाईन सातबारा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यानीही या कामी गती देऊन शेतकऱयाांना ऑनलाईन सातबारा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Source: https://www.maharashtra.gov.in/