Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

कृषी क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानासाठी सर्बियातील तज्ज्ज्ञ पथकाची मदत घेणार

मुंबई: राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढववण्यासाठी येथील शेतीचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचववण्यासाठी सर्बियातील तज्ञांचे पथक राज्यांस भेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हॉटेल ताज येथे सर्बियाचे पंतप्रधान ॲलेक्झांडर वुसिक यांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी सर्बियाच्या भारतातील राजदुत श्रीमती नंरिदर चौहाण, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्रयांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,भारताचा पुर्वीपासुन मित्र राष्ट्र असलेल्या सर्बिया हा देश शेती व आधुनिक तंत्रज्ञानात पुढारलेला आहे. या देशातील तज्ञांचे महाराष्ट्रातील शेतीच्याविकासासाठी चांगले सहकार्य लाभेल. सर्बियात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकरण्यासाठी तेथील तज्ञांचे पथक राज्जयास भेट देणार आहे.

हे पथक राज्जयातील शेतीचा अभ्यास करुन शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास करणार आहे. त्यानुसार त्यांच्याकडुन महाराष्ट्राला शेती क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे. या भेटीने महाराष्ट्र आणि सर्बिया यांच्यामध्ये सहकार्याचा नवीन मार्ग तयारहोण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्रयांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्बियाचे पंतप्रधान ॲलेक्झांडर वुसिक यांना महाराष्ट्रातील गुंतवणूकीची संधी, राज्यांच्या आर्थिक विकासदर, आधुनिक तंत्रज्ञानातील वाढ, राज्यातील खेडी डिजिटल करणे, त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात सुरु असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांची माहिती दिली.

महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून येथील संस्कृती, परंपरा आणि लोकजीवन चांगले आहे. भारतातील प्रगत राज्यास सहकार्य करण्यास आम्हाला निश्चितच आनंद होईल. महाराष्ट्र आणि आमचे भाविष्यात एकमेकांना चांगले सहकार्य राहील, अशी ग्वाही सर्बियाचे पंतप्रधान ॲलेक्झांडर वुसिक यांनी दिली.

Source: https://www.maharashtra.gov.in/